भाजपा पक्षात होणार हे बदल, फडणवीसांची रवानगी केंद्रात ?

भाजपा पक्षात होणार हे बदल, फडणवीसांची रवानगी केंद्रात ?


        सध्या भाजपा पक्षात मोठे बदल होत आहेत. वेगवेगळ्या नेत्यांना केंद्रात मंत्रिपदे देण्याच्या बातम्या गेल्या आठवड्यापासून सुरूच आहेत. यातच नव्या चर्चेला उधान आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते. 

       जर फडणवीस यांना केंद्रात जागा मिळाली तर महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवार या दोघांपैकी एक विरोधी पक्षनेता होण्याची शक्यता आहे. सध्या भाजपा पक्षात गटबाजीला उधान आले आहे. एक गट फडणवीसांच्या विरोधात आहे, परंतु त्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस होत नसल्याने अंतर्गत शांतात अजून कायम आहे. असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

        देवेंद्र फडणवीस हे जर केंद्रात गेले तर महाराष्ट्राला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो असेही एकनाथ खडसे म्हणाले. केंद्रात अर्थखात्यात मंत्रिपद फडणवीसांना मिळू शकते.

Previous Post Next Post