आळंदी हादरली - ४ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दादा म्हणाऱ्यानेच केला गुन्हा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत चारवर्षीय मुलगी व १४ वर्षीय अल्पवयीन आरोपी हे एकाच बिल्डींग मध्ये राहत आहेत. आरोपी हा बिल्डींगच्या खालच्या खोलीत राहतो तर पिडीत मुलीचे कुटुंब हे पहिल्या मजल्यावर राहते.
१४ वर्षीय अल्पवयीन आरोपीने चार वर्षीय चिमुकलीला तळमजल्यावर खेळताना पहिले नंतर या आरोपीने या चिमुकलीला मोबाईल चे आमिष दाखवून घरात बोलावले व तिच्यासोबत दुष्कृत्य केले.
यानंतर चिमुकली रडत आईकडे गेली. आईला सुरवातीला वाटले मुलगी पडल्यामुळे रडत असावी. पण जेंव्हा मुलीच्या शरीरातून होणारा रक्त स्राव आईने पहिला तेंव्हा काहीतरी अघटीत आपल्या मुलीसोबत घडले असा पक्का विश्वास आईला झाला. त्यानंतर आईने मुलीला विचारले असता ती फक्त दादा दादा अस म्हणू लागली. घरच्यांनी जेंव्हा या मुलीला इस्पितळात नेले तेंव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे आढळून आले.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे ४ फेब्रुवारीला पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील चौकशी पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव हे करीत आहेत.