आमच्या जीवाला धोका - मा. जितेंद्र आव्हाड आणि मा.विजय वडेट्टीवार
राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या दोन्ही नेत्यांनी आपल्या सुरक्षितेत वाढ करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या सुरक्षितेचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की काही नक्षलवादी संघटनांनी यापूर्वीही आमच्या घराची पाहणी केली आहे याचे पुरावेही मिळाले आहेत. यामुळे आमच्या सुरक्षितेत वाढ करण्यात यावी.
त्याच बरोबर नक्षलवाद्यांचा धोका लक्षात घेता काँग्रेस चे नेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली आहे. या दोघांच्या मागणीवर विचार करू व पोलिसांच्या मदतीने हा निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
डोळ्याच्या डॉक्टरचाच डोळा धारदार शस्राने काढला.
डोळ्याच्या डॉक्टरचाच डोळा धारदार शस्राने काढला..हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला असून मिळालेली माहिती अशी की सतिश वानखडे व अक्षय जाधव हे बहिणीला विमानतळावर सोडून मुंढवा रोडवरून जात होते. रस्त्याने जात असताना एक कार समोरून जोरात येऊन या दोघांच्या गाडीला कट मारला. या दोघांनी जाब विचारला असता कार मधील चार जन भलतेच चिडले. हे पाहून सतिश व अक्षय यांनी तशीच गाडी चालू करून निघून जाण्याचा प्रयत्न केला. Read More
Tags:
Maharashtra