देवेंद्र फडणवीस यांचे लहानपणीचे सुंदर फोटो तुम्ही पाहिलेत का ? Beautiful childhood photo of Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर मध्ये झाला.त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर फडणवीस व आईचे नाव सरिता फडणवीस असे आहे. देवेंद्र फडणवीस १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकले. व पुढे वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद झाले. नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे व बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव अमृता फडणवीस असे आहे. देवेंद्र फडणवीस यांना एक मुलगी आहे . या मुलीचे नाव त्यांनी दिविजा असे ठेवले.

२००४ सालच्या निवडणुकी मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रतिष्टीत नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून पक्षातील आपले वजन वाढवले. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षीच मुख्यमंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली. फडणवीस महाराष्ट्राचे २८ वे मुख्यमंत्री होते. अत्यंत थोड्या कालावधीतच जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व उदयास आले
हे पण वाचा: भोंगे लावून नमाज पठण कशासाठी? राज ठाकरे