शंभूराजांचे मृत्यूच्या आधी अखेरचे शब्द..रक्त सळसळेल वाचूनच
१फेब्रुवारी१६८९ संगमेश्वरात मुकरब खानाने शंभू राजांना कैद केले होते. आता वडूद तुळापुर येथील औरंगजेबाच्या छावणीत तक्ता कुलाह आणि काटेरी साखळदंडांनी जखडून शंभूराजांना आणले गेले होत. औरंगजेबाने शेकडो प्रश्न विचारले. पण तख्तासाठी रक्तावर उलटणार जात नाही आमची. म्हणत शंभुराजे ताठमानेने औरंग्याच्या समोर उभे राहिले. मरणाला घाबरणारे लाखो योद्धे होऊन गेले. पण साक्षात मरण देखील ज्यांना घाबरलं ते शिवपुत्र शंभूराजे मरणाच्या दारात औरंग्याच्या समोर उभे होते.
shambhu rajanche Mrutyuchya Adhiche akherche shabd.
शंभूराजांच्या नजरेत नजर घालून औरंग्याने विचारलं, बता संभा कहा रखा है अपना शाही खजाना, मेरे कोण कौनसे सरदार शामिल थे तुम्हे. बोलो नही तो काट दूंगा. तसे कडाडले शंभुराजे मरणाचे चाळ करून पायात बांधलेत आम्ही जन्मदात्या बापाला विष देऊन गादिवर बसणार खानदान नाही आमचं. भावांच्या पाठीत सत्तेसाठी खंजीर खुपसणारि जात नाही आमची. खामोश- औरंगजेब संतापला, काट दूंगा गर्दन और डाल दुंगा कुत्तों के सामने. अंगभर रक्त सळसळत असलेले शंभूराजे कडाडले अरे खाल्लंच मांस आमचं कुत्र्यांनी तर त्याची जन्मला येणारी अवलाद सुद्धा असेल इमानदार. ध्यानी ठेव आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलुख तुझ्या घशात. इथला उंबरा ना उंबरा पैदा करेल पुन्हा एक नवा संभाजी. आम्हास मारून कधीच सुटणार नाही तू सलामत. तळहातावर मरण पेलून धरणारे आमचे जिगरबाज मावळे खोदतील तुझी कबर इथल्या मातीत. ज्या दिल्लीच्या तख्तासाठी तू रचतो आहेस, पापाचे डोंगर त्याच्या आसपासही मिळणार नाही तुला कबरीसाठी वाव भर जागा.
झोपताना लाईट बंद करत नसाल तर हे नक्की पहा
झोपताना लाईट बंद करत नसाल तर हे नक्की पहा
पेटत्या आगीतून ज्वाला बाहेर पडाव्या तसे शंभूराजांच्या ओठांतून शब्द बाहेर पडत होते. संतापलेल्या औरंगजेबाने आदेश दिला, आखे निकालो इसकी. एखाद्या तोफेतून गोळा सुटावा तसे शंभूराजांच्या ओठांतून शब्द बाहेर पडले. तुला दिसतात आणि खुपतात ती दोनच नाहीत आमचे डोळे. आमचे शेकडो, हजारो मावळे आमचे डोळेच आहेत. संतापलेला औरंगजेब म्हणतो, काट दो ये जबान पहले. बहुत बोलती है इसकी जबान. आता साक्षात मृत्यू समोर दिसत होता. पण मृत्यू समोर असताना देखील जिवंत सिंहाचा जबडा फाडणारे शंभुराजे मरणाला काय घाबरतील. अरे साक्षात मरण देखील ज्यांना घाबरलं आणि मरणाने देखील त्यांच्यासमोर गुडघे टेकले ते शिवपुत्र शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात ताठ मानेने उभे होते. औरंग्याच्या आज्ञेवरून डोळे काढले गेले. जीभ छाटली गेली. तरीही झुकली नाही मान की वाकली नाही नजर. मरण आले तरी चालेल पण शरण जायचं नाही. असं वाघाचं काळीज होतं संभाजी महाराजांच. अगदी मृत्यूच्या अखेरच्या घटके वेळीदेखील गुडघे टेकले नाहीत औरंगजेबाच्या समोर.
लग्नानंतर लोक का होतात जाड ?
जेव्हा शंभुराजांची गर्दन छाटण्याची आज्ञा दिली औरंगजेबानं तेव्हा रक्ताळलेल्या अंगान गर्दन वर आभाळाकडे करून शंभूराजे जणू मनोमन आबासाहेबांना म्हणत होते. आबासाहेब तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहत असान आम्हाला, पण तुमचं आभाळाएवढं रूप पहायला डोळेच नाही उरले आता. आग्र्यावरून येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो आम्ही, आमची फिकीर करु नका आबासाहेब. आम्ही सुखरुप गडावर पोहोचू. तसा आता तुम्हीही आमचा हात हात हाती घ्याल का हो आबासाहेब. पण आता ते हातही उरले नाहीत हातात घेण्यासारखे. तुम्हाला आबासाहेब म्हणून साद घालायला जीभही ही उरली नाही आता. पण एकच सांगतो आबासाहेब रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याचं मंदीर पवित्र होणार असेल, आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार असेल, तर मी रायगडाच्या जगदीश्वराला एकच मागणे मागेल हजार वेळा मृत्यु येऊ दे पण पुन्हा जन्म झालाच तर शिवपूत्र म्हणून यात मराठी मुलखात जन्माला येऊ दे.