लग्नानंतर लोक का होतात जाड ?

लग्नाआधी महिला व पुरुषांनी स्वतःला खूपच मेंटेन केले असते. शरीरयष्टी आकर्षक, सुडौल व काटक असते परंतु लग्न झाल्यावरच वजन वाढण्यास सुरुवात होते.
लग्नाआधी पुरुष व महिला जसे दिसतात तसे लग्न झाल्यावर दिसत नाही. लग्न झाल्यावर पुढील दोन ते तीन वर्षात किमान पाच ते दहा किलो वजन वाढतेच. याला एकमेव कारण असे लग्नाआधी प्रत्येक जण आपले शरीर आकर्षक सुडौल रहावे यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजेच डायटींग करणे, तेलकट पदार्थ कमी खाणे, मसालेदार पदार्थांचा आहारातील कमी वापर व व्यायाम करत असतो. परंतु लग्नानंतर या गोष्टींना वेळ मिळत नसल्याने वजनात नक्कीच वाढ होत राहणार. प्रामुख्याने लग्नानंतर 80 टक्के महिलांचे वजन वाढतेच. कारण लग्नाआधी जो आहार घेत असतात, त्या आहारात लग्नानंतर बदल होतोच. 

कुटुंबातील सर्व व्यक्तींना चविष्ट पदार्थ करून घालण्यासाठी जेवण बनवताना  तेलाचा वापर व मसाल्यांचा वापर जास्तच करावा लागतो. याचा थेट परिणाम वजन वाढीवर होतो. तसेच बऱ्याच महिलांना लग्न नंतर कामाच्या व्यापामुळे व्यायाम करायला ही वेळ मिळत नाही. शरीराचा व्यायाम न झाल्यास सुद्धा वजन वाढायला सुरुवात होते. त्याचबरोबर बरेचदा मानसिक ताणतणाव सुध्दा वजन वाढीस कारणीभू ठरतो. नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर बाहेरचं खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी वाढू लागते.

Post a Comment

Previous Post Next Post