सावधान पृथ्वी विनाशाकडे
समुद्राच्या पाण्याचे तापमान सतत वाढत आहे. पण हे वाढतं तापमान आपल्याला विनाशाकडे घेऊन जाताय. काय होऊ शकत या वाढत्या तापमानामुळे? या वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवर विनाशाचं संकट यायला जास्त वेळ लागणार नाही. पृथ्वीवरच्या समुद्राचे तापमान वेगाने वाढते आहे. या तापमान वाढीचा वेग इतका आहे की, सेकंदाला पाच अनुबॉम विस्फोटा इतकी उष्णता समुद्रात तयार होत आहे. येत्या काही वर्षातच अख्ख जग पाण्याखाली जाऊ शकत.
earth to destruction
समुद्रात सोडले जाणाऱ्या उष्णतेमुळे हवामान तज्ञांनी ही विनाशाची ची भविष्यवाणी वर्तवली आहे. नुकत्याच संपलेल्या 2019 या वर्षात समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या दहा वर्षापासून समुद्राच्या पाण्याचे तापमान सतत वाढत आहे. यातच अलीकडील पाच वर्षात समुद्राच्या पाण्यातील तापमानाची अधिकच वाढ झाली आहे. शास्त्रज्ञांच्या मते 2019 या वर्षात समुद्राच्या पाण्याचे तापमान ०.०७५ अंश सेल्सियस इतका वाढला आहे. हा आकडा मोठा जरी दिसत नसला तरी अमेरिकेने हिरोशिमा वर टाकलेल्या अनुबॉमच्या उष्णतेच्या 3.6 अब्ज उष्णता समुद्राला गेल्या पंचवीस वर्षात मिळाल्याचं आकडे सांगत आहेत. दर सेकंदाला पाच अनुबॉम्ब इतकी उष्णता समुद्रात निर्माण होत आहे.
समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे काय परिणाम होतो?
- वाढत्या तापमानामुळे हिमखंड वेगाने वितळत आहेत. त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्याचबरोबर सागरी जीवन सुद्धा धोक्यात आल आहे. तसेच तापमान वाढीमुळे वातावरणात बाष्पाची अधिक निर्मिती होत आहे.
- समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे चक्रीवादळे अधिक शक्तीशाली होत आहेत.
- तसेच पावसाची तीव्रता देखील वाढत आहे.
- औद्योगिकरण यापासून पृथ्वीचे तापमान आत्तापर्यंत फक्त एक अंश सेल्सिअसने वाढले आहे. मात्र त्याचा परिणाम म्हणून आपण अतिवृष्टी, दुष्काळ, वनवे इत्यादी संकटांना तोंड देत आहोत. हे तापमान असंच दिवसेंदिवस वाढत राहिलं तर एक ना एक दिवस पृथ्वीचा विनाश अटळ आहे. यामुळेच आतापासून तापमान वाढू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.