लग्नाच्या तिसऱ्या दिवसी नवरी गेली पळून...

लग्नाच्या तिसऱ्या दिवसी नवरी गेली पळून...

अहमदनगर: हा धक्कादायक प्रकार तीन दिवसांपूर्वी मढी देवस्थान परिसरात घडला. नवीनच लग्न झालेलं जोडपं मढीला कानिफनाथांच्या दर्शनासाठी गेले होते. मुलीच्या अंगावर नवे कपडे, दागिने होते. दोघांनी हि मनोभावे देवाचे दर्शन घेतले.

            दर्शन घेतल्यानंतर दोघे हि सोबतच गडाखाली उतरले. गाडी पार्किंग मध्ये लावलेली असल्याने नवरा मुलगा गाडी आणण्यासाठी गेला आणि नवरीने मिळालेली संधी साधून चक्क   प्रियकराच्या गाडीवर बसून पळ काढला. हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

            काही वेळाने नवरदेव गाडी घेऊन आला. पण त्याला नवरी मुलगी कुठेच दिसेना. बराच वेळ तो तिचा शोध घेत राहिला. जवळपास शोध घेतला. त्याने तेथील दुकानदाराकडे चौकशी केल्यावर असे कळले की एक नवरी दुचाकीवर बसून गेल्याचे समजले.

            तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता नवी नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याचे त्याच्या लक्षात आले. नंतर नवर्या मुलाने नवरीच्या घरी फोन लाऊन सरळ भाषेत नवरी पळून गेल्याचे सांगितले






Post a Comment

Previous Post Next Post