डॉ. अमोल कोल्हे यांच्या या ४ गोष्टी तुम्हाला आत्त्तापर्यंत माहितीच नाहीत. | 4 Thing of Amol kolhe.
1) अमोल कोल्हे याचं पुर्ण नाव डॉ. अमोल रामसिंग कोल्हे असे आहे. अमोल कोल्हे यांचा जन्म १८ सप्टेंबर १९८० रोजी पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. अमोल कोल्हे यांच्या वडिलांचे नाव रामसिंग भागुजी कोल्हे आणि आईचे नाव रंजना रामसिंग कोल्हे असे आहे.
२) अमोल कोल्हे यांचा विवाह ६ डिसेंबर २००७ रोजी झाला असून पत्नीचे नाव अश्विनी अमोल कोल्हे असे आहे. अश्विनी कोल्हे यावैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा आहे.
३) अमोल कोल्हे यांनी त्याचं 8 वी पर्यंतच शिक्षण त्यांच्या गावीच घेतले. पुढील १२ वी पर्यंतचे शिक्षण पुण्यातील आपटे प्रशालेतून पुर्ण झाले आहे.सेठ गोवर्धनदास सुंदरदास (मुंबई) येथून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली आहे.
४) अमोल कोल्हे यांना भाषा शैली मुळे राजकारणातही उतुंग यश मिळाले आहे. सन २०१४ पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. फेब्रुवारी २०१९ रोजी अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. व पुढे जोरदार प्रचार व लोकप्रियतेच्या बळावर २३ मे,२०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेचे 3 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांना 58483 मतांनी पराभूत केले.