नागपूर : मंगळवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास कळमना परिसरात ही संतापजनक घटना घडली. मंगळवारी संध्याकाळच्या वेळी पीडित मुलीचा मित्र तिच्या घरी एक पुस्तक आणायला गेला होता. हे दोघेही ११वीचे विद्यार्थी आहेत.
त्यानंतर दोघे घराबाहेर रोडला फेरफटका मारायला गेले असता तिघांनी त्यांना गाठले. दोघांनाही बेदम मारहाण केल्यावर त्यांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केले. मित्राने वारंवार विनवण्या करूनही त्यांनी थोडी सुद्धा दया दाखविली नाही.
या घटनेनंतर पीडित मुलीने घरच्यांच्या मदतीने कळमना पोलिस ठाणे गाठले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.
जळगाव : जळगाव शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरात घर भाडे तत्वावर घेण्याचा बहाणा करून २ व्यक्ती व 1 महिला आली. घरात आलेल्या लोकांनी महिलेला पाणी मागितले. माणसांसाठी पाणी आणायला जात असलेल्या व्यावसायिकाच्या बायकोच्या डोक्यात कशानेतरी मारून तिला जखमी केले. पुढे वाचा