आदित्य ठाकरेंच्या या चार गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? Aditya Thakeray
१) आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील कमी वयातील ख्यातिवंत राजकारणी असून युवासेना या शिवसेनेच्या युवाकेंद्रित संघटनेचे प्रमुख आहेत. ते शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. आणि शिवसेनाचे संस्थापक श्री स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आदित्य ठाकरेंच्या आईचे नाव रश्मी ठाकरे असे आहे. सध्या ते वरळी मतदार संघातून MLA आहेत.
२) आदित्य ठाकरे यांची जात चंद्रसेनिया कायस्थ प्रभू अशी आहे आणि धर्म हिंदू आहे.त्याच बरोबर त्यांची रास मिथुन आहे.आणि उंची ५.१०" इतकी आहे. आदित्य ठाकरेंचे शिक्षण - कला विषयात पदवी संपादन केली आहे. त्याच बरोबर बॅचेलर ऑफ लॉ ची सुद्धा पदवी घेतली आहे.
हे पण वाचा: रोहित पवारांविषयी आपल्याला हि माहिती हवीच.
३) आदित्य ठाकरे यांचा जन्म वार बुधवार १३ जून १९९० रोजी मुंबई येथे झाला. आज रोजी वय ३० वर्ष आहे. आदित्य ठाकरे यांनी वयाच्या २०व्या वर्षीच म्हणजे 2010 मध्येच शिवसेनेत प्रवेश केला आणि युवा सेनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. पुढे आदित्य ने महाराष्ट्रा सोबतच जम्मू-काश्मीर-बिहार-राजस्थान-मध्यप्रदेश येथे युवा सेना युनिटची स्थापना केली.
४) आदित्य ठाकरे यांनी ३ ऑक्टोंबर २०१९ रोजी वरळी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. आणि या मतदार संघातून प्रचंड मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादीचे सुरेश माने यांचा ६७४२७ मतांनी आदित्य ठाकरे यांनी पराभव केला.
Tags:
Political