कोरोना व्हायरस पेक्षाहि घातक आजार, 96 लाख लोक एका वर्षात मृत्युमुखी....
कॅन्सर मुळे दरवर्षी संपूर्ण जगात 1 कोटी ८० लाखाहून जास्त लोकांना कॅन्सरची लागण होते. 96-lakh-cancer-death-in-word. तर कमीत कमी ९६ लाख लोक दरवर्षी आपला प्राण गमावत आहेत. कॅन्सर मुळे संपूर्ण भारतात दरवर्षी 7,84,821 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. यात स्त्रियांची संख्या 3,71,302 तर पुरुषांची संख्या 4,13,519 इतकी आहे. दर आठ मिनिटाला 1 स्त्री या कर्करोगाने आपला प्राण गमावत आहे. त्याच बरोबर दरवर्षी 11,57,294 लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याचे समोर आले आहे.
कॅन्सर हा मानवी शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा रोग आहे. २०० पेक्षा जास्त प्रकार या कॅन्सरचे आहेत. प्रामुख्याने शरीरामध्ये जुन्या झालेल्या पेशींची जागा नवीन पेशी घेत असतात. परंतु कॅन्सरच्या रुग्णामध्ये हि वाढ आवश्यकता नसतानाही होत राहते.
कॅन्सर मुख्य प्रकार :
ल्यूकेमिया: रक्त तयार करणाऱ्या ऊतींमध्ये होणारा कर्करोग.
कार्सिनोमा: त्वचेमधून उद्भवणारा कर्करोग.
सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सर: मेंदू आणि पाठीच्या कण्यातील होणारा कर्करोग.
लिंफोमा आणि मायलोमा: शरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.
सार्कोमा: हाडे, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या यामधून होणारा कर्करोग.
(वरील माहिती २०१८ च्या रिपोर्ट नुसार आहे)
हे पण वाचा: दात दुखी, दात किडणे यावर आयुर्वेदिक उपचार पद्धती