भगवद्गीता हा ग्रंथ हिंदूंचा पवित्र ग्रंथ मानला जातो. How the Pandava army is described in the Bhagavad Gita भगवद्गीता ग्रंथामध्ये सगळे मिळून अठरा अध्याय आहेत. या सर्व अध्याय मध्ये श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद वर्णित केला आहे. भगवद्गीता या ग्रंथाची सुरुवातीला दोन पात्र आली आहेत. एक म्हणजे धृतराष्ट्र आणि दुसरा संजय. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद तसेच युद्धाचे वर्णन हा संजय धृतराष्ट्र ला सांगत आहे.
पहिल्याच अध्याया मध्ये धृतराष्ट्र संजयला म्हणाला कुरुक्षेत्र मध्ये युद्धासाठी जमलेले कौरव-पांडव काय करत आहेत. त्यांचे नियोजन काय प्रकारचे आहे. धृतराष्ट्राच्या प्रश्नावर संजयने युद्धभूमी चे व युद्धासाठी सज्ज असलेल्या क्षेत्रियांचे वर्णन करण्यास सुरुवात केली. संजय म्हणाला दुर्योधनाने पांडवांचे व्यूह रचना केलेले सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्य जवळ गेला आहे. आता दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणत आहे, हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र धृष्टधुन्म ने केलेली पांडवांची ची ही भलीमोठी सेना पहा. या सेनेमध्ये मोठी मोठी धनुष्य धारण करणारे भीम - अर्जुन यांसारखे पराक्रमी आहेत.तसेच महारथी सात्यकी, विराट आणि द्रुपद कसे आहेत, त्याचबरोबर दृष्टकेतू ,चेकितान, काशीराज, पुरुजीत, कुंतिभोज, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे सर्व पुत्र या युद्धातील महारथी आहेत.
त्यावर दुर्योधन पुढे असे म्हणाला आपल्या सैन्यामध्ये सुद्धा अनेक शूरवीर आहेत. यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते असे आहेत की जे माझ्यासाठी प्राणही देऊ शकतात. त्याचबरोबर ते युद्ध कलेमध्ये प्राविण्य मिळवलेले आहेत. आमचे सैन्य पांडवांचे सैन्यापेक्षा अधिक आहेत. त्याचबरोबर पितामह भीष्म कडून सर्व बाजूंनी सुरक्षित आहे. पुढे संजय धृतराष्ट्रास सांगत आहे की, पितामह भीष्म ने दुर्योधनाला खूष करण्याकरता मोठ्याने शंख वाजवला. त्यानंतर युद्ध क्षेत्रात मोठ्या मोठ्यांनी शंख, नगारे, ढोल, झांज ही वाद्य एकदम वाजवण्यात आली. यामुळे खूपच मोठा आवाज आसमंतात घुमू लागला.
त्यानंतर पांडव सैन्याने सुद्धा शंख व वाद्य नाद सुरू केला. पांढरे घोडे जोडलेल्या मोठ्या रथामध्ये बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपले शंख वाजवली . श्रीकृष्णाने पाश्चजन्य व अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला. त्याचबरोबर भिमा पौंड्र नावाचा शंख वाजवला. त्याचबरोबर कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. आणि नकुल ने सुघोष आणि सहदेवाने मनी पुष्पक नावाची शंख वाजवले. व दोन्ही सैन्य युद्ध करिता सज्ज झाली.
Tags:
Entertainment