मा. रोहित पवार यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका. काय बोलले रोहित पवार




मा. रोहित पवार यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका. काय बोलले रोहित पवार

         देशामध्ये गेल्या पाच वर्षापासून बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. Rohit Pawar criticizes the central government मात्र केंद्र सरकार याकडे लक्ष देत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अमरावती मध्ये आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमांमध्ये रोहित पवार यांनी भाषणाच्या वेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला.  रोहित पवार पुढे म्हणाले बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या गेल्यात.


          चांगल्या प्रकारचे शिक्षण घेणारे लोकांना त्या प्रकारच्या संधीसुद्धा राहिलेल्या नाही. त्याचबरोबर व्यवसायासाठी लागणारे सुद्धा वातावरण केंद्र सरकारकडून युवा तरूणांना व लोकांना मिळत नसल्याचे, रोहित पवार यांनी सांगितले. शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय काही मार्ग निघणार नाही. व केंद्र सरकारने याच्यावरती लवकरात लवकर विचार करावा. असे यावेळेस रोहित पवार म्हणाले.

हे पण वाचा:  डॉ. अमोल कोल्हे यांच्या या ४ गोष्टी तुम्हाला आत्त्तापर्यंत माहितीच नाहीत.

Post a Comment

Previous Post Next Post