
दात दुखी हा आजार बहुधा सर्वांनीच अनुभवलेला आहे. दात वेळोवेळी साप न करणे, अति गोड पदार्थ खाणे, जास्त वेळा चहा पिणे, चॉकलेट खाणे, यामुळे दात किडून दुखायला सुरुवात होते. अशावेळी आयुर्वेदिक उपचार खूपच कामी येतात.
दात व दाढ दुखीवर खालील उपाय करावे
१) दाढ किंवा दात दुखत असेल तर लवंग दाताखाली दहावी किंवा लवंग चे तेल दात व दाढ दुखत असेल तिथे लावावे व काळी मिरी लवंगाचे तेल एकत्र मिसळून दुखणाऱ्या ठिकाणी ठेवावे
२)त्याचबरोबर लिंबाच्या तेलाने सुद्धा दात व दाढ दुखी थांबते
3) मोहरीचे तेल व मीठ यांचे मिश्रण दुखणाऱ्या ठिकाणी ठेवावे
४) दात दुखी वरती पेरूची पाने सुद्धा रामबाण उपाय आहे दररोज दिवसातून दोन वेळा पेरुचे पान दुखणाऱ्या ठिकाणी चावल्यास दात व दाढ दुखी वरती आराम पडू शकतो
5) दात व दाढ दुखत असेल तर अति गार व ती गरम पदार्थ खाणे टाळावे त्याचबरोबर अतिशय गोड पदार्थ सुद्धा खाणे टाळावे शरीरात कॅल्शियम वाढवणारे घटकांचे सेवन दररोज करत असाल तर दात दुखीचा त्रास होत नाही