मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अति महत्वाच्या ३ गोष्टी. तुम्हाला माहिती असायलाच हव्या.
मा.उद्धव बाळ ठाकरे हे महाराष्ट्रातील ख्यातिवंत राजकारणी असून शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. 3-things-of-udhav-thakare उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री आहेत.२००३ सालच्या आधी उद्धव ठाकरे हे सामना वृत्तपत्राच्या कामकाजात लक्ष देत होते. २००३ मध्ये मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्षपद मा.उद्धव ठाकरेंकडे सोपवले.
उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै १९६० रोजी मुंबई येथे झाला. आज रोजी त्यांचे वय ६० वर्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी कास्ट चंद्रसेनिया कायास्त प्रभू असी आहे. व धर्म हिंदू आहे. उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचे नाव बाळ ठाकरे असे आहे व आईचे नाव मीना ठाकरे असे आहे. उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर मुंबई येथून घेतले. त्याच बरोबर कॉलेज सर जमसेतजी जीजेभोय आर्ट विद्यालय मुंबई येथून घेतले आहे. पुढे १३ डिसेंबर १९८८ रोजी त्यांचा विवाह रश्मी पाटणकर (ठाकरे) यांच्याशी झाला. आज दोघांच्या पोटी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे.
२०१४ साली कोणत्याही पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे ६३ आमदार निवडून आणले. आणि नंतर मग भाजपा पक्षाबरोबर युती केली. त्याचबरोबर २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपा सोबत युती करून निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. परंतु काही अडचणीमुळे भाजपा बरोबरची युती तुटली व शिवसेना पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून सरकार स्थापन केले. व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली.
हे पण वाचा: शिवभोजन थाळी विषयी मा.अजित दादा व आदित्य ठाकरे काय बोलले.
Tags:
Political