शिवभोजन थाळी विषयी मा.अजित दादा व आदित्य ठाकरे काय बोलले. आज शिवभोजनथाळी योजनेचे झाले उत्घाटन.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आजपासूनच शिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. Shivbhojan thali. अजित पवार यांनी पुण्यातून तर आदित्य ठाकरे यांनी मुंबईतून शिवभोजन योजनेचे उत्घाटन केले. यावेळी अजित पवार म्हणाले ज्यांची ऐपत असेल त्यांनी योजनेचा लाभ जरी नाही घेतला तरी चालेल. गरीब व्यक्तीला मात्र या योजनेचा फायदा झाला पाहिजे.
या शिवभोजनाच्या थाळीमध्ये डाळ भात, भाजी , दोन चपात्या, लोणचे सामाविष्ट असून ग्रामीण भागामध्ये या थाळीचे शहरी भागापेक्षा 15 रुपयांनी कमी ठेवण्यात आले आहे. या योजने मुळे गरीब लोकांना पोटभर जेवणाचा आनंद घेता येणार आहे. आजही शहरात व ग्रामीण भागात अत्यंत वाईट आर्थिक परिस्थिती मुळे लोक पोटभर खाऊ शकत नाही. ते आता कमी खर्चात सुखाचा घास घेऊ शकतात.
आदित्य ठाकरे(पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री) यांनी मुंबईमध्ये या शिवथाळी या योजनेचे उत्घाटन केले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, पोटासाठी कोणताही जात धर्म नसतो , सर्वाना चांगले अन्न मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.