इंस्ट्राग्रामवरील मैत्री पडली महागात : ज्यूसमधून दारू पाजून कारमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
See24News :- जाटल रोड शेजारील एक कॉलनीत राहणाऱ्या एका मुलीला इंस्ट्राग्राम वर मुलाशी मैत्री करणे चांगलेच भोवले आहे. हि मुलगी इयत्ता 11 वी ची विद्यार्थिनी आहे.14-year-old girl raped in car. या मुलीची 15-20 दिवसांपूर्वीच ‘इंस्ट्राग्राम’वरून आरोपी आशीषशी जिव्हाळ्याची मैत्री झाली होती. काही दिवस चॅटिंग केल्या नंतर दोघांनी एकमेकांन आपापले मोबाइल नंबर दिले. मग दोघे जन मोबाईल वरून बोलायला लागले.आणि मग एक दिवस निश्चित करून मुलाने या मुलीला भेटण्यास मॉडल टाऊन येथील डीएव्ही पार्कजवळ बोलावले.
पिडीत मुलगी भेटायला आली. आल्यानंतर मुलाने तिला कारमध्ये बसवले. कारमध्ये आधीपासूनच दोन मुले होती. यातील एकाने तिला ज्यूस मधून दारू पाजली. थोड्याच वेळात मुलीची शुद्ध हरपली, नंतर या नराधमांनी एका तळ्याजवळ कार उभी करून दोघांनी आळीपळीने तिच्यावर बलात्कार केला. सगळे झाल्यानतर या दोघांनी मुलीला अर्धनग्न अवस्थेत डीएव्ही पार्कजवळ फेकून दिले. तेथील काही लोकांनी हा प्रकार बघितला. व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोघा आरोपींना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
पीडित मुलीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.