लग्नाच्या पहिल्याच रात्री मुलगी बोलली मी माझ्या प्रियकराची आहे, मला स्पर्श करु नकोस…

लग्नाच्या पहिल्याच रात्री मुलगी बोलली मी माझ्या प्रियकराची आहे, मला स्पर्श करु नकोस…

first-night-of-marriage
See24News:  सुंदर मुलीशी लग्न जमल्यापासून मुलगा हवेतच होता. विचारही न्हवता केला इतकी भारी मुलगी मिळाल्यामुळे आनंदाला पारावर राहिला नव्हता. लग्नाची तारीख जवळ आली. लग्नहि झाले. आणि पहिल्याच रात्री मुलीने नवर्याला सांगितले मला स्पर्श करू नकोस मि तुझी नाही. मी इतर कुणाची तरी आहे. हे ऐकून नवरा सुन्नच झाला.
  माहितीनुसार हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील आहे. उत्तरप्रदेशातील मुकंदरपूर येथे राहणाऱ्या एका युवकाचे जवळच्याच गावातील एका मुलीशी त्याच्या घरच्यांनी लग्न जमवले. मुलगी दिसायला अप्रतिम होतीच. परंतु परिस्थिती गरिबीची असल्यामुळे लग्नाचा संपूर्ण खर्च मुलाच्या घरच्यांनीच केला. अगदी थाटामाटात लग्न करण्याचे ठरले.

   लग्नाच्या दिवशी एक अनोळखी व्यक्ती मंडपात सारखीच फिरत होती. त्या व्यक्तीला विचारले तेंव्हा नवरीचा भाऊ असल्याचे सांगितले. नवरीला निरोप देई पर्यंत या खोट्या भावाने नवरीची साथ काही सोडली नाही.
 नवरी लग्न होऊन घरी आली तरी हा मुलगा तिच्या घरी हि पोहोचला. घरातील लोकांना वाटले या मुलाला दुखः झाले असेल म्हणून दारू पिऊन घरी आला. एक मात्र खरे या मुलाने कसलाही गोंधळ घातला नाही. शांततेत शेवट पर्यंत राहिला. रात्रीच्या वेळी मुलीने त्याची समजूत काढून त्याला परत घरी पाठून दिले.

    जेंव्हा पती व पत्नी त्यांच्या फुलांनी सजवलेल्या खोलीत गेले. नवरा जसाजसा नवरीच्या जवळ येऊ लागला तशी तशी तिच्या मनात व चेहऱ्यावर खालवर होऊ लागली. नवरा स्पर्श करणार तोच नवरी मुलगी म्हणाली , मला अजिबात स्पर्श करू नकोस. मी तुझी नाही आणि होऊ पण शकत नाही. मि माझ्या प्रियकराची आहे. हे ऐकून नवर्याला धक्काच बसला. सुन्न होऊन तो तसाच बसून राहिला.
    कसीबशी रात्र उलटली या नवऱ्या मुलाने नवरी कडच्याना बोलून घेतले तसेच पोलीसानाही बोलून घेतले. मुलीने पोलिस आणि नातेवाईकासमोर सांगितले मला माझ्या प्रियकराबरोबर लग्न करायचे आहे. दोन्ही कुटुंबाच्या व नवरदेवाच्या पुढाकाराने परत या मुलीचे आणि तिच्या प्रियकराचे लग्न लाऊन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post