आठ दिवसापूर्वी अपघातामध्ये चेंदामेंदा होऊन मृत्यू पावलेला तरुण जिवंत होऊन घरी आला.
नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता, त्या तरुणाच्या घरच्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा केले होते. त्या तरुणाच्या दहाव्याचा कार्यक्रम 1 फेब्रुवारीला होणार होता. परंतु त्याआधीच तो घरी आल्याने सर्वांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. young-being-alive
घरच्यांनी दुसर्याच कोणत्यातरी अनोळखी व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याचा उलगडा हा तरुण घरी आल्यानंतर झाला. शहादा तालुक्यातील नारायणसिंग आनंदसिंग गिरासे याचा शिरपूर महामार्गावर रात्री 9 च्या आसपास अपघात झाला होता. शेजारीलच एका हॉटेलवाल्याने अपघाताची माहिती व तरुणाचा पूर्णपणे चेंदामेंदा होऊन मृत्युमुखी पडल्याची बातमी घरच्यांना फोनवरून कळविली होती.
सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून घरच्यांनी या मृतदेहावर अंत्यसंस्कारहि केले. मात्र दहाव्याच्या कार्यक्रमाच्या आधीच मृत तरुण जिवंत होऊन घरी आल्याने घरच्यांना मोठा आनंद झाला. हा तरुण घरी आल्यानंतर घरच्यांनी दुसर्याच अनोळखी व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याचे उघड झाले आहे.