कावळे मारून कौवा बिर्याणी विकण्याचे प्रकार आले समोर. येथे विकली जात होती कौवा बिर्याणी व लोलीपॉप.
रन चित्रपटातील कौवा बिर्याणी तर अनेक लोकांना माहितीच असेल. या चित्रपटात स्वस्तात बिर्याणी विकली जायची म्हणून लोक गर्दी करून खायचे. पण खाणार्यांना काय माहित हि बिर्याणी कशाची आहे ते. kaua-biryani
असाच एक प्रकार तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे घडला आहे. येथील एक बिर्याणी विक्रेता कौवा बिर्याणी व लोलीपॉप विकत असल्याचे समोर आले आहे. तामिळनाडू पोलिसांनी त्याला पकडे असता, धक्कादायक माहिती उघड झाली असल्याचे कळते. रामेश्वरम मधील एक व्यक्ती खूपच स्वस्तात बिर्याणी विकत असल्याने त्याच्यावर संशय घेऊन फूड डिपार्टमेंटने त्याच्यावर छापा टाकला. अधिकार्यांनी या छाप्यात वेगळ्याच प्रकारचे मांस पाहून ते आवक झाले.
अधिक माहिती घेतली असता हे मांस कावळ्याचे असल्याचे समजले. याबाबत हा व्यक्ती कोठून कावळे आणतो शोधले असता असे समजले की काही शिकारी मंदिर परिसरात विषारी तांदूळ टाकून कावळे पकडतात व येथील काही बिर्याणी बनवून विकणाऱ्या लोकांना हे कावळे विकले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहक सुद्धा अतिशय आवडीने हि बिर्याणी खात असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.