५ दिवसात कांद्याच्या दारात झाली इतकी घसरण.

५ दिवसात कांद्याच्या दारात झाली इतकी घसरण.



गेल्या पाच - सहा दिवसापासून सतत कांद्याच्या दारात घसरण सुरूच आहे. कांद्याची मोठ्याप्रमाणात आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दारात घसरण होऊ लागली आहे. सरकारने कांद्यावर जी निर्यात बंदी लावली आहे ती जर उठवली नाही तर कांद्याच्या दारात आणखी घसरण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.


   दुसऱ्या देशातून आयात केलेला कांदा आणखी जेएनपिटी बंदरातच आहे. तो मार्केट मध्ये आल्यावर सुद्धा कांद्याची आवक वाढून दारात घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


   अहमदनगर, पुणे, नाशिक, मनमाड या बाजारसमितीमध्ये या चार पाच दिवसामध्ये कांद्याच्या दारात मोठी घसरण झाली आहे.चार पाच दिवसामध्ये प्रती क्विंटल ७०० ते १२०० रुपये इतकी घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. इथून पुढे कांदा शेतकऱ्यांना रडवतो की काय असा प्रश्न उभा राहतो


Previous Post Next Post