या तारखेला येणार कर्जमाफीची पहिली यादी. पहिल्या यादीत किती शेतकरी..


या तारखेला येणार कर्जमाफीची पहिली यादी. पहिल्या यादीत किती शेतकरी..


          कर्जमाफीची पहिली यादी. महाराष्ट्र राज्य सरकार ने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजेनेतील सर्व शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे ऑडीट चे काम सरकारी लेखापरीक्षकांकडून पुर्ण झालेलेच आहे. त्याच बरोबर सर्व यादी सरकारी वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहेत. 


           आता या याद्यांची पुन्हा एकदा पडताळणी होऊन या योजेनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीत तसीच राहणार आहेत. आता हे काम २० फेब्रुवारी पर्यंत पुर्ण होऊन या याद्या २० फेब्रुवारीला किंवा त्यानंतर प्रसिध्द होण्याची माहिती सहकारी विभागातील वरिष्ठांनी दिली आहे.


       जिल्हा बँकेचे कर्जदार शेतकऱ्यांचे ऑडीट चे काम सुद्धा पुर्ण झाले आहे. जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची संख्या हि ३ लाख 9 हजार इतकी आहे. लवकरात लवकर सरकारी ऑडीट चे काम पुर्ण होऊन कर्जमाफीची रक्कम खात्यात येण्याची वाट कर्जदार वर्ग पाहत आहे. 



५ दिवसात कांद्याच्या दारात झाली इतकी घसरण.
Previous Post Next Post