धक्कादायक - शिक्षकाने अश्लिल क्लिप दाखून विद्यार्थीनीसोबत केले गैर वर्तन
नांदेड शहरातील विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील क्लीप दाखवून विकृत वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधम शिक्षकाचे नाव स्वप्नील शृंगारे असे आहे. या शिक्षकाने शाळेत पिडीत विद्यार्थिनीला बोलून मोबाईल मध्ये अश्लिल क्लीप लाऊन मुलीसोबत नको ते चाळे केले.
ह्या गलिच्छ वर्तनानंतर या शिक्षकाने मुलीला जर हि गोष्ट कुणाला सांगितली तर शाळेच्या इमारतीवरून खाली फेकून देण्याची धमकी सुद्धा दिली.
या घटनेनंतर गावकरी व मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार देऊन शाळा बंद ठेवली आहे. त्याचबरोबर आरोपी स्वप्नील शृंगारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.