३ बायका सोबत राहीना म्हणून महाराजाने चक्क विवाहीतेलाच पळवले.
३ बायका सोबत राहीना म्हणून महाराजाने चक्क विवाहीतेलाच पळवले. भंडारा शेजारच्या मोह्दुरा गावात हि घटना घडली. या गावात 27 जानेवारी ते ३ फेब्रुवारी असे भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. ७ दिवस या महाराजाने खूपच बड्या बड्या बाता ठोकल्या. आपल्या रसाळ मुखाने गावातील सर्वांचीच मने जिंकली. त्यातच या महाराजाची नजर दररोज सप्ताहात येणाऱ्या एका महिलेवर पडली. आणि आपल्या रसाळ वाणीने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढलेच.
साप्ताह संपल्यानंतर या महाराजाने चक्क महिलेला घेऊन पलायन केले. महिला गायब झाल्याने घरच्यांनी शोध घ्यायला सुरु केली. महिलेच्या घरातील काही लोकांनी महिलेला महाराजाबरोबर मोबाईल वर बोलताना पहिले होते. घरच्यांनी महाराजावरच संशय घेऊन महाराजाला फोन लावला. पण महाराजाने काही फोन उचलला नाही. मग महिलेला या लंपट महाराजानेच पळवली असल्याची खात्री पटली.
महिलेच्या घरच्यांनी या महाराजाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. महिलेच्या घरच्यांनी महाराजांचे घर घाटले असता असे समजले की महाराजाला आधीच्या ३ बायका आहेत. पण महाराजाच्या अश्या स्वभावामुळे एकही त्यांच्या जवळ नाही. म्हणून महाराजाने चौथीला पटवून पळून नेले.
हे पण वाचा:
Tags:
Entertainment