भरचौकात तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न.
महाराष्ट्र मधील वर्ध्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयात शिक्षक असणाऱ्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच दहशत पसरली आहे.
सविस्तर माहितीनुसार आरोपी विकी नरगाळे या तरुणाने एकतर्फी प्रेमातून असे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या आरोपीने महाविद्यालयात कामावर चाललेल्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न केला आहे. यापूर्वी देखील या तरुणाने पिडीत तरुणीला बस मध्ये त्रास दिला असल्याची माहिती कळली आहे.
या प्रकारामुळे पिडीत तरुणीची प्रकृती गंभीर आहे. या तरुणीवर नागपूर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पिडीत तरुणीचा चेहरा पूर्णपणे जाळला असून तिचे डोळे सुद्धा गेले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.