हास्यसम्राट कीर्तनकार इंदुरीकर महाराज भयंकर अडचणीत.
हास्यसम्राट कीर्तनकार इंदुरीकर महाराज भयंकर अडचणीत.आपल्या दमदार अशा कीर्तनातून लोकांचे प्रबोधन करणारे महाराज इंदुरीकर महाराज देशमुख त्यांच्याच एका कीर्तनातील वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांनी केलेले हे विधान प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हा असून या वक्तव्यामुळे महाराजांवर गुन्हा दाखल होऊन गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्ष शिक्षा होऊ शकते.कीर्तनात इंदुरीकर महाराज म्हणाले सम तिथीला संग झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला मुलगी होते. या वक्तव्यावरूनच इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत.
Tags:
Maharashtra
