मुलीला पळून जाणे पडले महागात, इतक्या लोकांनी दिला जीव.
मुलीला पळून जाणे पडले महागात, इतक्या लोकांनी दिला जीव. हि घटना गडचिरोलीतील आनंद नगर मधील आहे. मुलीचे दुसऱ्या जातीतील एका तरुणावर प्रेम जडले होते. मुलीने याची कल्पना दीड - दोन महिन्यापूर्वीच घरच्यांना दिली होती. परंतु या मुलीच्या घरून तिच्या लग्नाला प्रबळ विरोध होताच. मुलीने वारंवार विनवण्या करून सुद्धा घरच्यांनी तिच्या लग्नाला मान्यता दिली नाही.
मग मुलीने अखेर पळून जाण्यचा निर्णय घेतला. व ठरल्याप्रमाणे शनिवारी मुलीने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला. मुलीच्या ह्या निर्णयामुळे घरच्यांना जबर मानसिक धक्का पोहोचला. मुलीचा भाऊ साहिल रवींद्र वरगंटीवार , वडील रवींद्र वरगंटीवार व आई वैशाली रवींद्र वरगंटीवार
या तिघांनी आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. आणि परिसरातील एका विहिरीवर जाऊन विहिरीच्या बाहेर मोबाईल व चप्पला काढून ठेवल्या आणि विहिरीत उडी मारून आपले आयुष्य संपवले. काही वेळाने तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगल्याने आजूबाजूच्या लोकांना दिसले. व हि बातमी संपूर्ण गावात पसरली. आणि पाहतापाहता लोकांनी विहिरीवर गर्दी केली.
Tags:
Maharashtra
