भाजपच सरकार राज्यात पुन्हा येणार
भाजपच सरकार राज्यात पुन्हा येणार. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी खळबळजनक वक्तव्य केल आहे. भाजपचे सरकार पुन्हा येणार व मा. सुरेश धस हे मंत्री होणार असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आ. सुरेश धस यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील कुसळंब येथे केले आहे. याच वक्तव्या मुळे राजकारणात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यापूर्वी सुद्धा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे सरकार पुन्हा येणार असल्याच वक्तव्य केल होत. त्यातच भर म्हणून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हे नवीन वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी हि जास्त काळ टिकणार नाही असेही ते म्हणाले.