डोनाल्ड ट्रंप यांचाच विजय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावर मतदान घेण्यात आले आहे. घेण्यात आलेल्या मतदानात ट्रंप यांचाच विजय झाला असून ५२ विरुद्ध ४८ मत हि डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने आहेत.
दुसऱ्या आरोपाबाबत सुद्धा मतदान देण्यात आले. संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्याचा हा आरोप होता या मतदानात सुद्धा ५३ विरुद्ध ४७ मत पडून डोनाल्ड ट्रंप यांचाच विजय झाला. त्यानंतर डोनाल्ड ट्रंप यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अमेरिकेमध्ये महाभियोगाला मंजुरी मिळण्याकरिता २ तृतीअंश सभासदांनी महाभियोगा समर्थनार्थ मतदान करणे गरजेचे असते. जर २० सभासदांनी ट्रंप यांच्या विरोधात मतदान केले असते जर महाभियोगाला मंजुरी मिळाली असती.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोरोना व्हायरस वर औषध सापडल... हिंदू महासभेचा दावा..
कोरोना व्हायरस ने जगभर थैमान घातले आहेत. आणखी यावर वैज्ञानिकांना सुद्धा कोणतेही औषध सापडले नाही. जगभर संशोधन सुरु असून सुद्धा हवे तेवढे यश मिळत नाही असे संशोधनातून समोर आले आहे.
परंतु भारतातील हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी कोरोना व्हायरस वर अजब प्रकारच औषध सांगितले आहे. सकाळच्या वेळी गोमुत्र पिऊन ओम नमःशिवाय चा जप करत गाईच्या शेणाच सेवन केल्याने कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊच शकत नाही. ह्या अजब दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. Read More....