डोळ्याच्या डॉक्टरचाच डोळा धारदार शस्राने काढला.
डोळ्याच्या डॉक्टरचाच डोळा धारदार शस्राने काढला..हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला असून मिळालेली माहिती अशी की सतिश वानखडे व अक्षय जाधव हे बहिणीला विमानतळावर सोडून मुंढवा रोडवरून जात होते. रस्त्याने जात असताना एक कार समोरून जोरात येऊन या दोघांच्या गाडीला कट मारला. या दोघांनी जाब विचारला असता कार मधील चार जन भलतेच चिडले. हे पाहून सतिश व अक्षय यांनी तशीच गाडी चालू करून निघून जाण्याचा प्रयत्न केला.
परंतु कार मधील व्यक्तींनी या दोघांचा पाटलाग करत त्यांना अडवले. व कार मधील चौघांनी धारदार शस्राने या दोघांच्या शरीरावर व डोळ्यावर वर केले. या हल्ल्यात सतिश वानखेडे हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी तपास घेत या हल्यातील आरोपी रितेश जाधव व अविनाश गायकवाड यांना २४ तासातच अटक केली आहे.