कोरोना व्हायरस वर औषध सापडल... हिंदू महासभेचा दावा..
कोरोना व्हायरस ने जगभर थैमान घातले आहेत. आणखी यावर वैज्ञानिकांना सुद्धा कोणतेही औषध सापडले नाही. जगभर संशोधन सुरु असून सुद्धा हवे तेवढे यश मिळत नाही असे संशोधनातून समोर आले आहे.
परंतु भारतातील हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी कोरोना व्हायरस वर अजब प्रकारच औषध सांगितले आहे. सकाळच्या वेळी गोमुत्र पिऊन ओम नमःशिवाय चा जप करत गाईच्या शेणाच सेवन केल्याने कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊच शकत नाही. ह्या अजब दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खरे पाहता आत्ता पर्यंत भारतात बर्याचश्या आजारावरती वेगवेगळ्या स्वामींनी बहुउपयोगी आयुर्वेदिक औषधे सांगितली आहेत. आणि कोरोना व्हायरस वर आयुर्वेदिक उपाय फक्त भारतातच सापडू शकतात असाही तज्ञांचा दावा आहे.
