पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने रचला नवा डाव.




पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने रचला नवा डाव.


       पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने रचला नवा डाव. भाजपला महाराष्ट्रातील राजकारणात बहुमत मिळून सुद्धा सरकार स्थापन करता नाही आले. पवारांच्या उत्तम राजकारणी खेळी पुढे भाजपा टिकू शकली नाही. अनेक प्रयत्न करून सुद्धा भाजपला सरकार स्थापन करता नाही आले. या उलट पवारांनी बहुमत नसताना सुद्धा शिवसेना , काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती करून महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले.


     पवारांमुळे सत्ता गेल्यामुळे भाजपच्या केंद्रातील व राज्यातील काही बड्या नेत्यांना चैन पडण्याची चिन्हे दिसेनात. पवारांविरोधात मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. भाजपा पक्ष श्री.छ.उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद देऊन महाराष्ट्रात पवारांना थांबवण्याची जबाबदारी देऊ पाहत आहे. श्री.छ.उदयनराजेंची  महाराष्ट्रातील लोकप्रियता व प्रखर व्यक्तिमत्व यांचा विचार करून पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे लक्षात येते.


Previous Post Next Post