शून्याचा जास्तीत जास्त वापर भाजपने केला- आ. रोहित पवार

शून्याचा जास्तीत जास्त वापर भाजपने केला- आ. रोहित पवार


शून्याचा जास्तीत जास्त वापर भाजपने केला- आ. रोहित पवार यांनी केली भाजपवर टीका. कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बीड च्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. हि बैठक बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये रोहित पवार यांनी भाजपवर जबरदस्त टीकास्र सोडले. रोहित पवार यावेळी म्हणाले शून्याचा शोध हा आर्यभट्टानी लावला खरा पण त्याचा अधिकाधिक वापर हा भाजपा सरकारनेच केला आहे.

     त्याच बरोबर पुढे रोहित पवार म्हणाले भाजपचे काही लोक महाविकास आघाडीचे सरकार हे टिकू शकत नाही असे वारंवार बोलत असतात. परंतु हे सरकार पाच वर्ष कुठेही जात नाही. हे सरकार शेवटपर्यंत टिकणार म्हणजे टिकणारच. असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला. भाजपच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना म्हणव पाच वर्षानंतर तुमच सरकार येण्याची स्वप्ने बघा. आत्ता तुमच सरकार येऊ शकत नाही. असेही ते म्हणाले.

  जो कोणी कार्यकर्ता पक्षासाठी निष्ठावंत कामे करील त्याचा मान राखण्याच काम सुद्धा आमचच आहे. त्या कार्यकर्त्यावर कधीही अन्याय होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी सेल्फी काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या भोवताली गराडा घातला. तब्बल सव्वा तास रोहित पवार हे कार्यकर्त्यामध्येच अडकून पडले होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्ती करून कार्यक्रम आटोपता घेतला.
Previous Post Next Post