तिचं फसवं प्रेम- एक सत्य कथा | love-breakup-real-story-2020

तिचं फसवं प्रेम- एक सत्य कथा 

love-breakup-real-story-2020


                     एकदा मी असच एका बागेत फिरायला गेलो होतो. इकड तिकड बघत चालत असताना मला एक मुलगी दिसली, अगदी साधी सुधी होती. पहिल्याच नजरेत मला ती हवी हवीशी वाटू लागली. याचा परिणाम असा झाला कि मी त्या मुली साठी रोज त्या बागेत फिराया येऊ लागलो. तिच्याकडे बघत बसायचो. काही काळ माझं असच हेलपाटे मारायचं काम चालू होत. अनेक वेळा आमची नजरा नजर व्हायची.
                   ती अलगद गालातल्या गालात हसून माझ्याकडे बघायची तेंव्हा मळा खूपच भारी वाटायचं. पण माझी तिच्याशी बोलायची हिम्मत होत नव्हती. कदाचित त्यावेळी तिला अस वाटत असेल की मि तिच्याशी बोलाव पण ज्या ज्या वेळी मि तिच्याशी बोलण्यासाठी मोठ्या हिमतीने जायचो त्यावेळी माझ्या हृदयाचे ठोके जोरा जोराने वाढत असत. हे अस बर्याच दिवस चालल होत. 

                       एक दिवस मला माझ्या मामाचा फोन आला. त्यांनी मला मुंबईत जोब बघितला होता. म्हणून मी एक आठवडा मुंबईतच थांबलो होतो. आठवड्या भरात इंटरव्हिव वैगरे उरकून सोमवारच घरी आलो. आणि संध्याकाळ होताच त्या मुलीशी फायनल बोलण्याच्या हेतूने मी तिच्या घराजवळ असणाऱ्या बागेत गेलो. पण मला बागेत गेल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. 

                      मी जिच्यावर प्रेम करत होतो जिच्यासाठी रोज उपाशी तापाशी बागेत येऊन बसायचो, ती मुलगी दुसऱ्याच मुलासोबत होती. हे पाहून काहीकाळ माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. काळ्जाच पाणी पाणी झाल. जीवनात मी पहिल्यांदाच एका मुलीवर खुप जास्त प्रेम केल होत. 

                   रडत रडत घरी आलो. डोक नुसत ठणकत होत. पण चुकी माझी देखील होती. मि तिला माझ्या मनातल प्रेम कधी सांगितल नाही........
उर्वरित कथा लवकरच...............
आणखी वाचण्यासाठी संकेतस्थळाला भेट देत राहा

Previous Post Next Post