रोहित पवारांविषयी आपल्याला हि माहिती हवीच.

              
रोहित पवारांविषयी आपल्याला हि माहिती हवीच.
रोहित पवारांविषयी आपल्याला हि माहिती हवीच. थोडक्यात पण महत्वाची
     ' रोहित राजेंद्र पवार ' कर्जत जामखेड मतदार संघातून सम्पूर्ण महाराष्ट्रात गाजलेले नाव. त्याचबरोबर कर्जत-जामखेड मतदारसंघा सोबत सम्पूर्ण महाराष्ट्रातील युवकांचे कमी वेळेत मन जिंकलेले लाडके नेते. 
rohit pawar biography


        २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडनुकी मध्ये कर्जत-जामखेड मतदार संघातून राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार हे १३५८२४ इतक्या प्रचंड बहुमताने विजयी झाले. या निवडणुकानंतर रोहित पवारांची सम्पूर्ण महाराष्ट्र भर चर्चा होत आहे. रोहित पवार हे पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील विधानसभा सदस्य आहेत. त्याच बरोबर बारामती अॅग्रो लिमिटेडचे ते कार्यकारी अधिकारी तसेच भारतीय साखर उद्योग असोशिएशन चे अध्यक्षहि आहेत.
हे पण वाचा अशा मुलीशी लग्न करतान तर आयुष्यभर सुखी राहतान.
   रोहित पवार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1985 रोजी श्रीमती राजेंद्र पवार आणि श्रीमती सुनंदा पवार यांच्या पोटी झाला असून रोहित हे भारताचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे नातू आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथून केले आहे. त्याच बरोबर पदवी शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून पुर्ण केले आहे. रोहित पवार यांनी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट विषयाचा अभ्यास पदवी शिक्षणातून पुर्ण केला आहे. नंतर पुढे रोहित पवार यांचे लग्न कुंती मगर यांच्याशी झाले. आज या दोघांच्या पोटी दोन मुले आहेत. रोहित पवार राजकारणात जितके लक्ष देतात तितकेच घरातील व्यक्तींवर प्रेम सुद्धा करतात.


Post a Comment

Previous Post Next Post