दिल्ली विधानसभा निवडणूक आल्याने सर्वच राजकीय पक्ष आपआपला प्रचार जोरदार करीत आहेत.
प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका ट्विटर अकाउंट वरून असाच वादास कारणीभूत ठरेल असा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. या ट्विटर अकाउंटचे नाव आहे पोलिटिकल किडा. या अकाउंटवर अपलोड केलेल्या व्हिडिओ मध्ये तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
political kida twiter account Video shaha-modi rajenchya svarupat
political kida twiter account Video shaha-modi rajenchya svarupat
शिवसेना व संजय राउत यांच्या विरोधात आवाज उठवणारे आता या व्हिडीओ वर आवाज उठावतीन का असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. आपल्या राज्यांची आता व भविष्यात कोणीही बरोबरी करू शकत नाही . मग ते कोणीही असो. असे असून सुद्धा समाजात अशांतता पसरवणार्या गोष्टी बिनधास्त सोसिअल मेडिया वर शेयर होत आहेत.
मा. संजय राउत यांना विचारल्यावर ते असे म्हटले की मी हा व्हिडीओ भाजपच्या सगळ्या नेत्यांना तसेच भिडेंना सुद्धा पाठवला आहे. आता मि त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सर्व संघटना कुठे गेल्या असा प्रश्न राउत यांनी केला.Delhi Election 2020 ft. Shah-ji pic.twitter.com/I1WFf3lYnL— Political Kida (@PoliticalKida) January 19, 2020