जावायानेच केली सासू-सास-याला जबर मारहाण
बायकोच्या आई वडिलांना मारहाण करणाऱ्या जावया सोबत इतर चार जणांवर प्रत्येकी दोन वर्षाची सक्तमजुरीची व ५ हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राहणारे वृषाली किसन ठुबे हिचा २०१३ मध्ये आरोपी पावलस कचरू गायकवाड याच्यासोबत लग्न झाले होते.
लग्नानंतर काही दिवसांनी पती हा वृषालीला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. यामुळे तिने पती विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती़.
हे पण वाचा: महिलेला विवस्त्र करून केली चोरी
हि माहिती पतीला समजल्यानंतर त्याने सासरवाडीला जाऊन आई वडिलांना जबर मारहाण केली व वृशालीला जबरदस्तीने घरी घेऊन गेला. या प्रकरणी वृशालीच्या आई वडिलांनी जावई व त्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. एकूण साक्षी पुरावे पाहून जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षाची सक्तमजुरीची व ५ हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.