रोहित पवार - Rohit Pawar
रोहित पवार - Rohit Pawar-' रोहित राजेंद्र पवार ' कर्जत जामखेड मतदार संघातून सम्पूर्ण महाराष्ट्रात गाजलेले नाव. त्याचबरोबर कर्जत-जामखेड मतदारसंघा सोबत सम्पूर्ण महाराष्ट्रातील युवकांचे कमी वेळेत मन जिंकलेले लाडके नेते.
२०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडनुकी मध्ये कर्जत-जामखेड मतदार संघातून राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार हे १३५८२४ इतक्या प्रचंड बहुमताने विजयी झाले. या निवडणुकानंतर रोहित पवारांची सम्पूर्ण महाराष्ट्र भर चर्चा होत आहे. रोहित पवार हे पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील विधानसभा सदस्य आहेत. त्याच बरोबर बारामती अॅग्रो लिमिटेडचे ते कार्यकारी अधिकारी तसेच भारतीय साखर उद्योग असोशिएशन चे अध्यक्षहि आहेत.
रोहित पवार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1985 रोजी श्रीमती राजेंद्र पवार आणि श्रीमती सुनंदा पवार यांच्या पोटी झाला असून रोहित हे भारताचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे नातू आहेत. बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, पुढे 12 वीपर्यंतचं शिक्षण रोहित पवार यांनी पुण्यात घेतलं. व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. त्यानंतर परदेशात शिक्षणाची संधी मिळाली असताना, परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याच निर्णय रोहित पवार यांनी घेतला. आणि वयाच्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये पदभार स्वीकारुन व्यवसायात सक्रीय झाले.
हे पं वाचा: आदित्य ठाकरेंच्या या चार गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
नंतर पुढे रोहित पवार यांचे लग्न कुंती मगर यांच्याशी झाले. आज या दोघांच्या पोटी दोन मुले आहेत. रोहित पवार राजकारणात जितके लक्ष देतात तितकेच घरातील व्यक्तींवर प्रेम सुद्धा करतात.
रोहित पवार माहिती
रोहित पवार महाराष्ट्र
रोहित पवार मराठी माहिती
रोहित पवार माहिती
रोहित पवार महाराष्ट्र
रोहित पवार मराठी माहिती
Tags:
Political