शरद पवार - शरद पवारांची राजकारणात एंट्री कशी झाली. एक रोमांचक किस्सा | Sharad Pawar - How did Sharad Pawar enter politics? An exciting story.

शरद पवार - शरद पवारांची राजकारणात एंट्री कशी झाली. एक रोमांचक किस्सा.




Sharad Pawar - How did Sharad Pawar enter politics? An exciting story.

   "शरद पवार" धडाडीचे नेतृत्व. शरद पवारांना ज्या बरामतीन पहिल्याच निवडणुकीत विरोध केला त्याच बरामतीन पुढ शरद पवारांना मुख्यमंत्री केल. असाच एक शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा. जो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माहिती हवा. 
Sharad Pawar - How did Sharad Pawar enter politics? An exciting story.



      साल1967 या वर्षातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यातघोषित केली होती. या वर्षी युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते शरद पवार. आणि शरद पवार वय होतं अवघं 26 वर्ष. तत्कालीन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील शरद पवारांना म्हणाले बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवशीलका.शरद पवार विनायक पाटील यांना हो म्हणाले खरे परंतु  बारामतीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवार या नावाला आपला विरोध दर्शविला. विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या नावाच्या शिफारस प्रस्तावाला बारामतीच्या तालुका काँग्रेसनं एक विरुद्ध अकरा असा निकाल जिल्हाकाँग्रेस कडे दिला. जिल्हा काँग्रेसने हा निकाल तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला. त्यावेळचे मा.मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये उमेदवारांची नावे आणि स्थानिक सदस्यांचे ठराव मांडले गेले. पुणे जिल्हा काँग्रेस ने बारामती काँग्रेसकडून आलेला ठराव पुढे करून शरद पवारांच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे असे सांगितले. त्यांचा निवडणुकीत पराभव होऊ शकतो अशी भूमिका मांडली व , पुण्याच्या मालतीबाई शिरोळे यांच्या उमेदवारी देण्याची मागणी केली.
           प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील व मुख्यमंत्री चव्हाण यांनी शरद पवार यांच्या नावाचाच आग्रह राखून धरला. पवारांच्या विरोधातील एकाला यशवंतराव चव्हाण यांनी विचारलं 270 जागांपैकी किती जागेवर काँग्रेसपक्षच विजयी होईल. तो नेता म्हणाला 190 ते 200 जागी तरी व्हायलाच पाहिजे. चव्हाण पुढे बोलले म्हणजे 80 उमेदवार पराभूत होतील. नेता म्हणाला होऊ शकतात. याच वाक्याचा आधार घेऊन यशवंतराव चव्हाण म्हणाले ठीक आहे. मग बारामतीची आणखी एक जागा आपण हरलो असे समजा. आणि शरद पवारांनाच उमेदवारी घोषित करा.

   अशाप्रकारे शरद पवार यांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. पण स्थानिक नेते व काही जनतेचा विरोध मात्र चालूच राहिला. पुढे शरद पवारांनी बारामती मधून जोरदार प्रचाराला सुरुवात केली.व शरद पवार हे प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा दुप्पट मताधिक्क्याने विजय झाले. याच बारामती ने राज्याला पुढे सर्वात तरुण मुख्यमंत्री दिला मा.शरद पवार यांच्या नावाने.१९६७ साला पासून आज पर्यंत शरद पवार हे राजकारणात उत्साही पणे सक्रीय आहेत. आजही सर्व तरुण कार्यकर्त्यांचा त्यांना मोठा आधार आहे. आणि मा.शरद पवार हे सुद्धा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. 

Post a Comment

Previous Post Next Post