HIV ग्रस्त महिलेवरच सामुहिक बलात्कार | Group rape of an HIV victim

HIV ग्रस्त महिलेवरच सामुहिक बलात्कार.

HIV ग्रस्त महिलेवरच सामुहिक बलात्कार | Group rape of an HIV victim

         HIV ग्रस्त महिलेवरच सामुहिक बलात्कार. बिहार राज्यातील भभुआ रोड स्टेशनवर नुकत्याच थांबलेल्या एक्सप्रेस रेल्वेमध्ये एका एच आय व्ही या आजाराने ग्रस्त असलेल्या २२ वर्षीय विधवा महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. याप्रकारचे कृत्य केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बीरेंद्र प्रकाश सिंग आणि दीपक सिंग हि या दोन आरोपींची नावे आहेत. पटना-भभुआ इंटरसिटी एक्सप्रेस भभुआ रोड स्थानकात आल्यानंतर डब्यांची पाहणी करत असताना आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांनी हा अत्याचार सुरू असल्याचे पहिले. दोन आरोपीं पैकी एक आरोपी या महिलेवर बलात्कार करत होता. तसेच दुसरा आरोपी शूटिंग करत होता, अशी माहिती जीआरपीच्या जवानांनी दिली. या वेळी दोन आरोपींना पोलिसांनी डब्यातच बेड्याठोकल्या. 

अत्याचार झाले तेव्हा पिडीत महिला डब्यात एकटीच बसली होती. ही पीडित महिला दवाखान्यातून तपासणीकरून पटण्याहून घरी जात होती. त्यावेळी हे दोघे आरोपी कुद्रा रेल्वे स्टेशनला ट्रेनमध्ये चढले. व पुढे ट्रेन थांबल्यानंतर दोघांनी महिलेला घेरले व हे दुष्कृत्य सुरु केले. या दोन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून. कोर्टाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post