पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद सगळ्यांनाच माहित आहे. हे दोघेही बहिण भाऊ एकाच व्यासपीठावर कधी येत नाही. पण आज सर्व राजकीय मतभेद विसरून हे दोघे बहीण भाऊ पंकजा मुंडे व धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आलेले आहेत.
Pankaja Munde aani Dhananjay Munde Ekach Karyakramat
गहिनीनाथ गडावरील संत वामन भाऊ यांच्या 44 व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या कार्यक्रमानिमित्त दोघेही बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आहेत. एकंदरीत पाहिले तर परळी विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध त्यांचे भाऊ धनंजय मुंडे उभे होते. आणि या निवडणुकीमध्ये त्यांचे भाऊ धनंजय मुंडे चांगलेच मताधिक्क्याने निवडून आलेले होते. यानंतर पंकजा मुंडे यांनी बीड कडे पाठ फिरवली होती. त्यानंतर आज दोघेही बहिण-भाऊ गहिनीनाथ गडावर कार्यक्रमासाठी एकत्र आले आहे. यामुळे यांच्यामधील दुरावा मिटेल का असा प्रश्न उपस्थित होतो.