श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरात बिबट्याची दहशत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सध्या देवदैठण परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्याचा अंदाज आहे. रात्रीच्या 9 वाजण्याच्या सुमारास देवदैठण येथे बनकर मळया लगत एका शेतात बिबट्याचे दर्शन झाले आहे. लोकांचा आवाज होताच या बिबट्याने उसामध्ये पळ काढला. परिसरात उस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा वावर अधिकच वाढला आहे. मागील आठवड्यात बनकर मळयातील पाळीव कुत्र्याचा फडश्या या बिबट्याने पडला आहे. त्याचबरोबर परिसरातील काही शेळ्या व जनावरे या बिबट्याने फस्त केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच बरोबर या बिबट्याला कुत्र्यावर हल्ला करताना सुद्धा काही लोकांनी पहिले आहे.
हे पण वाचा: सावधान पृथ्वी विनाशाकडे
रात्री अपरात्री शेतीपिकला पाणी देणे सुद्धा या बिबट्याच्या भीतीमुळे कठीण होऊन बसले आहे. दिवसाढवळ्या सुद्धा उसाच्या कडेनी जायला धास्ती भरत असल्याचे गावकरी सांगत आहेत. मध्यंतरी वनअधिकार्यांनी गावात पिंजरा लावला होता. त्यानंतर या बिबट्याला पकडण्याचे कोणतेही उपाय परिसरात झाले नसल्याचे समजते.