भोंगे लावून नमाज पठण कशासाठी ? राज ठाकरे
मुंबई: आमची आरती त्रास देत नाही ही तर तुमचा नमाज का त्रास देत आहे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर मशिदी वरची भोंगे हटवा अशी मागणी देखील राज ठाकरेंनी केली आहे. मशिदीवर भोंगे लावून नमाज पठण करण्याची काय गरज आहे. असा सवालही त्यांनी वेळीच केला आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा: महिलेला विवस्त्र करून केली चोरी
त्याच बरोबर पुढे राज ठाकरे असेही म्हणाले मी हिंदूही आहे आहे आणि मराठीही ही मी धर्मांतर केलेले नाही .माझ्या मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केला आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून मी अंगावर जाईल. असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का अशी चर्चा सुरू आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की मी पहिल्यांदाच सांगितला आहे, कि देशाची प्रामाणिक असणारे मुस्लिम देखील आमचेच आहे.
मनसेने झेंडया सोबत आपला अजेंडा देखील बदलला आहे. रंग बदलून सरकार मध्ये जाणार नाही असे ही राज ठाकरे म्हणाले आहे. त्याचबरोबर त्यांनी झेंड्यासाठी ही स्पष्टीकरण दिले आहे की हा नवीन झेंडा निवडणुकीसाठी वापरला जाणार नाही.