शरद पवार बायोग्राफी | Sharad Pawar Biography

शरद पवार बायोग्राफी | Sharad Pawar Biography


शरद पवार बायोग्राफी | Sharad Pawar Biography

शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आहे. गोविंदराव पवार हे निरा कनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते.पुढे ते बारामती येथील सहकारी बँकेचे व्यवस्थापक झाले. आणि शरद पवार यांच्या वडिलांचे नाव शारदाबाई पवार असे आहे. शारदाबाई पवार यांनी १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीचे प्रमुख पद सांभाळले. त्याचबरोबर प्रतिभा पवार ह्या शरद पवार यांच्या पत्नी आहेत. सौ. सुप्रिया सुळे ह्या शरद पवार यांच्या सुकन्या आहेत. तर अजित पवार हे पुतणे आहेत.
शरद पवार बायोग्राफी | Sharad Pawar Biography



          शरद पवार हे शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा भरवला. याच मेळाव्या पासून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली. पुढे वयाच्या २४ व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यांना पश्चिम जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, इटली, इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा अभ्यास केला आहे.पुढे १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले. श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक राहिले आहेत. पुढे १८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. व ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.



            त्यानंतर १० जून १९९९ रोजी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाने स्वतःच्या पक्षाची स्थापना केली.१९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर महाराष्ट्रात पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन मा. विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. २००४ मध्ये पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. तसेच याच वर्षी म्हणजे २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून पद सांभाळले. २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५२ जागा मिळाल्या. याच वर्षी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा वाटा होता.

शरद पवार यांचे कार्य

  1. कृषिमंत्री झाल्याबरोबर शरद पवार यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं.
  2. राज्यभर दूग्ध व्यवसाय वृद्धींगत केला.
  3. देशातील सर्वश्रेष्ठ अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शरद पवार यांनीच प्रतिष्ठा मिळवून दिली.
  4. युनेस्कोच्या फूड फॉर हंगर ऐवजी कामाच्या मोबदल्यात राशन देण्याचं काम शरद पवार यांनी केल.
  5. अनेक शेती, सहकार, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात उपयुक्त कार्य .
  6. बारामती कृषि प्रतिष्ठानची स्थापना केली.
  7. नेहरु तारांगणमधील आधुनिक केले.
  8. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना
  9. रयत विज्ञान परिषदेची स्थापना केली.
  10. प्राथमिक आरोग्य केंद्रातील मदतनिसांना पवारांनी वेतनवाढ केली.
  11. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील तफावत दूर केली.
  12. आणिबाणीत सक्तीने निवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पवारांनीच पुन्हा कामावर घेतलं.
  13. हिंगोलीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय.
  14. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात दिल.
  15. पुण्याच्या आसपास ऑटोमोबाईल आणि IT कंपन्यांच्या उभारणीला शरद पवार यांचच योगदान.
  16. मुंबईच्या समुद्रात तेलाचे साठे आढळले, त्यावर आधारित उद्योग महाराष्ट्रात ठेवण्यात यश.
  17. केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी माथाडी मंडळावरचा 248 कोटींचा आयकर माफ करून घेतला.
  18. सर्वात मोठी औद्योगिक वसाहत विदर्भातील बुटीबोरीला उभारली गेली.
  19. 1990 मध्ये शरद पवारांनी फलोत्पादन कार्यक्रम राबवला.
इत्यादी आणखी काही बरीचशी कामे पवारांनी केली आहे. शरद पवार यांच्या कामाला तोड नाही हे खरे.

Post a Comment

Previous Post Next Post