फेक न्यूज थांबवण्यासाठी बनवला कायदा १० वर्षाचा तुरुंगवास आणि ३.७७ कोटींचा दंड -fake news anti law

फेक न्यूज थांबवण्यासाठी बनवला कायदा  १० वर्षाचा तुरुंगवास आणि ३.७७ कोटींचा दंड

फेक न्यूज थांबवण्यासाठी बनवला कायदा १० वर्षाचा तुरुंगवास आणि ३.७७ कोटींचा दंड  -fake news anti law        सोशल मीडिया वरती फेक न्युज मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात असतात. याच फेक न्यूज चा वापर करून अनेक राजकीय नेते, सामाजिक बांधिलकी असलेले व्यक्ती, तसेच अनेक सेलिब्रिटी चा अपप्रचार करून बदनामी केली जाते. अशाप्रकारची बदनामी रोखण्यासाठी किंवा फेक न्यूज बनवणे थांबवण्यासाठी भारतामध्ये हे ठोस पावले उचलली गेली नाहीत. परंतु सिंगापूरमध्ये अशा प्रकारच्या बातम्या रोखण्यासाठी नवीन कायदा बनवण्यात आला आहे.
         या कायद्यानुसार खोट्या बातम्या पसरवणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. त्याच बरोबर कोणी जर अशी फेक न्यूज सोशल मीडिया वरती टाकली असेल तर ती हटवण्याचा अधिकार देखील सरकारला देण्यात आला आहे. त्याचबरोबर सिंगापूरमध्ये जर कोणी फेक न्युज बनवली, तर त्याला दोषी ठरवण्यात येणार आहे.  तसेच  दहा वर्षे तुरुंगवास आणि 3.77 कोटी रुपयांचा दंडहि होऊ शकतो. सिंगापूर या पद्धतीचा कायदा बनवणारा पहिला देश ठरला गेला आहे. यापूर्वीही ही मलेशिया देशाने अशा प्रकारचा कायदा केला होता, परंतु थोड्याच दिवसात तो संपुष्टात आला. अशा कायद्याची गरज सध्या भारतामध्ये आहे.

Post a Comment

Previous Post Next Post