ताप येणे वरती सोपे घरगुती उपाय


वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे, हवेतील संक्रमणामुळे, पाण्यामुळे तसेच सर्दीमुळे ही लहान मोठ्यांना ताप येण्याची दाट शक्यता असते. साधा ताप येत असेल तर तो ताप घरगुती उपाय करून थांबवता येतो. साध्या तापाची लक्षणे अंग गरम होणे, नाकातून गरम वाफ येणे, डोळ्यांची आग होणे, चक्कर येणे, डोके दुखणे लक्षणे ताप आल्यावर जाणवतात.
ताप वरती घरगुती उपाय
 १) एक कपभर पाण्यात आले व पुदिना टाकून त्याचा काढा करून घेतल्याने ताप उतरतो.
 2)  तुळशीच्या पानांचा काढा सुद्धा तापावर असरदार आहे.
 3)  थंडी वाजून ताप येत असेल तर ओवा खाल्ल्याने शरीरावर घाम येऊन थंडी वाजण्याची थांबते.
4)  ताप आल्यावर भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरते. तापामुळे शरीरातील पेशी कमी झाल्यास पपईच्या पानांचा रस काढून दिवसातून तीन वेळा घ्यावा.

1 Comments

Previous Post Next Post