भीषण अपघात सात जणांचा घटनास्थळी मृत्यू


जळगाव मध्ये काळीपिवळी जीप व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार जीप व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी व सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही काळीपिवळी जिप प्रवाशांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. या अपघातातील मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post