फ्रांसची राजधानी असलेल्या पेरीस मध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आंदोलन केले आहे. या अनोलनात अनेक ट्रॅक्टर सहभागी झाल्याने ट्रॅफिक जाम ची काहीशी स्थिती याठिकाणी झाली आहे. हे आंदोलन बघण्यासाठी शहरातील लोकांनी गर्दी केली आहे.
फ्रांस सरकार ने काही कीटकनाशक व पर्यावरण संबंधी लावलेल्या काही नवीन नियमांच्या विरोधात हे शेतकरी रोडवर उतरले आहेत. या नियमामुळे शेतीला धोका असल्याच येथील काही शेतकरी संघटनांनी सांगितले आहे.
फ्रांस मध्ये बीट या कंदमुळा पासून साखर निर्मिती कारखाने आहेत. आणि या नियमामुळे बिट उत्पादन कमी होऊन
कारखाने बंद पाण्याची भीती येथील शेतकरी व कारखाणार यांना वाटते. त्याचबरोबर इतरही जरुरी पिकांचे उत्पादन कमी होऊन खाद्य संकट उभे राहू शकते , अशी चिंताही शेतकऱ्यांच्यात आहे. यामुळेच शेतकरी रस्त्यावर उतरले असून जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत शेतकरी रस्त्यावरच राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.