तुर्की - सीरिया मध्ये झालेल्या भुकंपात या दोन्ही देशांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व जीवित नुसकान झाले आहे. ७.१ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने तुर्की - सीरिया हादरवून टाकले आहे. आतापर्यंत आतंकवादयांशी चाललेल्या संघर्षातून सावरण्याच्या आधीच भूकंपाने प्रचंड नुसकान केले.
दोन्ही देश मिळून साधारण ५००० पेक्षा जास्त इमारती कोसळल्या. व १४००० पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची आशंका आहे.या घटनेतून दोन्ही देशांना एक मोठे संकटच उभे ठाकले असून , भरीत भर हवामान २-३ डिग्री से. इतके असल्याने तर आणखीनच अडचणीत भर झाली आहे. ज्या लोकांची घरे उध्वस्त झाली ते तात्पुरता आश्रय शोधत आहे.बर्याचशा देशामधून राहत सामग्री व बचाव दल मदत या देशात येत आहे. भारतानेही तुर्कीला मदत केल्याचे समजते.